भारतात करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अगदी लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही करोना विषाणू नियंत्रणात आलेला नाही. मात्र अशा प्रतिकूल परिस्थित भारताचे गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? असा प्रश्न अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिला पडला आहे.

अवश्य पाहा – सनीचा ‘चपाती डान्स’ पाहिला का? व्हिडीओ होतोय व्हायरल…

नेमकं काय म्हणाली फराह खान?

“गृहमंत्री अमित शाह बेपत्ता झाले आहेत? त्यांना कुठल्याही वृत्तवाहिनीवर किंवा सोशल मीडियावर पाहिले नाही. नेहमी ते वृत्तमाध्यमांचे मथळे व्यापून टाकतात. कुणाला माहिती आहे का अमित शाह कुठे गेले?” अशा आशयाचे ट्विट फराह खान अली हिने केले आहे.

अवश्य पाहा – VIDEO : करोनाशी लढण्यासाठी ‘स्पायडरमॅन’पासून ‘बॅटमॅन’पर्यंत सर्व सुपरहिरो आले एकत्र

अमित शाह सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते आपली प्रतिक्रिया देत असतात. सध्या देशभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थित अमित शाह यांच्या फारशा अपडेट आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर फराहने केलेले हे ट्विट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.