गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. परंतु आता ही चर्चा प्रत्यक्षात उतरणार आहे. सारा आणि कार्तिक इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार असल्याचे समोर आले आहे. याचा फर्स्ट लुकही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये सारा आणि कार्तिक रोमाँटिक अंदाजात दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा आणि कार्तिक मुख्य भुमिकेत असलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवण्यात आलेले नाही. मात्र हा लव्ह आज कलचा सीक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमुळे सारा- कार्तिकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच ‘लव आजकल २’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघांनाही बाइकवर फिरताना पाहून तर चाहत्यांमध्ये आणखी चर्चा झाली होती.

कार्तिक आर्यने या चित्रपटाच्या फर्स्ट लुकचा फोटो ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. ‘माझा आवडता चित्रपट निर्माता इम्तियाज अली, सारा अली खान आणि रणदीप हुड्डासह सुरू केलेल्या नवीन प्रवासाठी मी खूप उत्साही आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने लिहिले होते.

सारा काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंहसह ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली होती. तर कार्तिक ‘लुका छुपी’ चित्रपटात दिसला हेता. पुढील वर्षी कार्तिकचा ‘पति पत्नी और वो’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of imtiaz alis film starring kartik aaryan and sara ali khan