तेलुगू बिग बॉस ४ ची स्पर्धक सरयू रॉय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला बिग बॉसमुळे खरी लोकप्रियता मिळाली होती. सध्या तिच्या शॉर्ट फिल्ममुळे सरयू वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शॉर्ट फिल्ममध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने तिच्यावर केला आहे. याच प्रकरणात तिला अटकही करण्यात आली आहे. पण तिने याला अफवा असल्याचे सांगितले आणि म्हणाली, ‘लोकांना काय पाहिजे ते लिहितील.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरयुने तिचं ग्रॅज्युएशन B.Tech बायोटेक्नोलॉजीमध्ये काम केलं आहे. सरयुने तिच्या मोठ्या बहिणीचा आदर्श ठेवत. मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. सरयु तिच्या मोठ्या बहिणीला गॉडमदर सुद्धा बोलते. या शिवाय सरयु ही लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबवर तिचं चॅनलं असून त्याच नाव 7Arts असं आहे. तिच्या युट्यूबरचे १.३ मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. या शिवाय तिने अनेक शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. यात Carpool, Tholi Parichayam, Gangster आणखी काही चित्रपट आहेत.

आणखी वाचा : “तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल

सरयू बिग बॉस सीजन ४ मध्ये दिसली होती. यात ती भूमि शेट्टी आणि अनुशा हेगडेसोबत दिसली होती. तिचं स्वप्न आहे की तिला Annapurna Studios चा एक भाग बनायचे आहे.

Photo : पेडर रोडवरील प्रभुकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी

सरयूच्या या व्हिडिओंपैकी एक Sarayu Clinic Lo Pellichoopulu हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. मात्र, बंजारा हिल्स पोलिस स्टेशनने अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये तिच्यावर आपल्या व्हिडिओद्वारे हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांनी सरयू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. सरयूने एका मुलाखतीत तिच्या अटकेच्या बातमीला अफवाह असल्याचे सांगत म्हणाली, मी पोलिस स्टेशनमध्ये त्यांना भेटायला गेली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नक्की काय समस्या होती?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former big boss telugu contestant sarayu roy accused of making hurtful religious statement know who is she dcp