विराट कोहली काहीच दिवसांपूर्वी मसक्कलीला विचारत होता की, ‘ती’ सध्या काय करते? त्यावर मसक्कलीने ‘ती’ सध्या स्वच्छता करतेय, असे उत्तर दिले. होय तुम्ही बरोब्बर एकलेय. ‘ती’ सध्या स्वच्छता करतेय. लवकरच स्वच्छतेचा संदेश घेऊन ती आपल्या भेटीला येणार आहे. आता ‘ती’ कोण असा प्रश्न विचारू नका.. त्याऐवजी तुमचे कान इकडे करा.
‘ती’ दुसरी तिसरी कुणी नसून विराटची एक्स अनुष्का शर्मा आहे. नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छादूत म्हणून लवकरच ‘ती’ तुम्हाला भेटायला येणार आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या तिच्या जाहिरातपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. त्यात अनुष्का स्वच्छतागृहांचे महत्त्व आणि एकंदर स्वच्छता याबाबत तुम्हाला जागृत करणार आहे.
खिलाडी तापसी
सध्या तापसी पन्नुचे दिवस फारच चांगले आहेत. हा महिना तिचाच आहे म्हणा ना! १७ फेब्रुवारीपर्यंत तिचे सहा सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ‘द गाझी अटॅक’, ‘तडका’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा २’, ‘रनिंग शादी डॉट कॉम’ ही या चित्रपटांची नावे. तिच्या ‘नाम शबाना’ या चित्रपटासाठी ती ‘खिलाडी’ होण्याचे प्रशिक्षण घेतेय. खास हॉलीवूडचे स्टंट ट्रेनर सिरील राफ्फेल्ली तिला नव्यानव्या आणि धाडसी स्टंटचे प्रशिक्षण देणार आहेत. सिरीलसारखे गुरू मिळाल्यामुळे तापसी सध्या खूप खूश असते व जोमाने सराव करतेय. लवकरच हैदराबादमध्ये हे स्टंट चित्रित होणार आहे.
मसक्कली