‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ तुफान लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ग्रेसी सिंग साऱ्यांनाच लक्षात असेल. ‘लगान’मधील गौरी आणि ‘मुन्नाभाई’मधील चिंकी या भूमिका साकारत ‘ग्रेसी’ने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र या चित्रपटांनंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र आता ती पुन्हा कलाविश्वात सक्रिय होणार असून एका मालिकेच्या माध्यमातून ती कमबॅक करणार आहे. ग्रेसी लवकरच ‘संतोषी माँ-सुनाए व्रत कथाएं’ या मालिकेतून कलाविश्वात पुनरागमन करणार असून या मालिकेमध्ये ती संतोषी माँ ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

“मी यापूर्वीही संतोषी मातेची भूमिका साकारली आहे आणि त्यानंतर आता पुन्हाच तिच भूमिका वठविण्याची संधी मिळणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हे एका स्वप्नाप्रमाणे भासत आहे. कोणत्याही देवी-देवतांच्या भूमिका साकारणं सोपी गोष्ट नसते. मात्र या भूमिकांमध्ये खूप सकारात्मकता असते”, असं ग्रेसीने सांगितलं.