७ मार्च (शक्रवार ) रोजी प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ‘गुलाब गँग’च्या नावाने मोबाईल गेमची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांवर आधारित या गेमचे स्वरूप असून, ‘गुलाब गँग – दी गेम’ असे या मोबाईल गेमचे नाव आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते या मोबाईल गेमचे अनावरण करण्यात आले. गुलाब गँग आणि गुंडा गँगमधील संघर्ष या गेममध्ये आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गेमची प्रमुख वैशिष्ट्ये –
- अॅक्शन प्रकारातील या गेममध्ये २५ पातळ्या आहेत
- अनेक गँग सदस्य निवडण्याची सोय
- प्रत्येक पातळीत खास अशी शस्त्रे आणि व्यक्तिरेखा आहेत
- जोरदार हल्ला करण्यासाठी ताकद वाढविण्याची सोय
- सह-सदस्यांची श्रेणी वाढविण्याची सोय
- सोशल मिडिया इंन्टिग्रेशन
- तुमचे स्वत:चे गेम प्रॉफाईल करून कूल अवतार धारण करू शकता
- नवीन मित्रांना सामील करून त्यांना आव्हान देऊ शकता
- जास्तित जास्त स्कोर करून नोंदविण्याची सोय
First published on: 07-03-2014 at 07:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulaab gang launches its mobile game