तेजस्वी, लखलखत्या, पल्लेदार स्वरांचे स्वामी असणाऱ्या मा. दीनानाथ यांना केवळ ४२ वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांची जागा अन्य कोणी घेणं अशक्यच. तरीही इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, त्याप्रमाणे स्वराधीश भरत बलवल्ली मा. दीनानाथांचं गाणं घेऊनच जन्माला आला. केवळ आवाजच नाही तर दीनानाथांच्या व त्याच्या चेहऱ्यातील साम्यही अचंबित करणारं आहे. दीनानाथांचा हा जणू गुणर्जन्मच! दीनानाथांनी गायलेली अनेक नाटय़गीतं ‘दिव्य संगीत रवी’ या नव्या अल्बममध्ये भरतच्या आवाजात ऐकण्यास मिळतात. यानिमित्त ‘लोकसत्ता’शी त्याने खास संवाद साधला.
माझे बाबा तबलावादक असल्याने घरात गाण्याचं वातावरण होतंच. साधारण नववी-दहावीत असताना मी पं.
या अल्बमचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. मा. दीनानाथांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या मंगेशकर भावंडांनीही माझं वेळोवेळी कौतुक केलं आहे.
केवळ या अल्बमलाच नाही, तर माझ्या कारकीर्दीला मंगेशकर परिवाराचा आशीर्वाद लाभला आहे. दीनानाथांच्या गायकीला उजाळा दिल्याबद्दल, त्यांच्या गायकीचं पुनरुज्जीवन केल्याबद्दल समस्त मंगेशकरांनी माझे आभार मानल्येत. ही प्रशंसा सुखावणारी आहे. लतादीदींसह सर्व मंगेशकरांनी माझं गाणं अनेकदा प्रत्यक्ष ऐकलं आहे. मंगेशकर आणि माझ्यातलं आणखी एक साम्यस्थळ म्हणजे सावरकरभक्ती. दुर्दैवाने, माझ्या पिढीला सावरकरांचं मोठेपण ठाऊक नाही, त्यामुळे त्यांच्या कवितांचा स्वतंत्र अल्बम यायला हवा, असं वाटलं आणि सावरकरांच्या ५० कविता मी स्वरबद्ध केल्या. त्यातली निवडक गीतं आता मराठीत ‘स्वतंत्रते भगवती’ आणि िहदीत ‘हमही हमारे वाली है’ या अल्बमच्या माध्यमातून लवकरच येतायत.
यासाठी मराठीत शरद पोंक्षे यांनी तर िहदीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी निवेदन केलं आहे. दीनानाथांचं गाणं पुढे नेताना मला माझ्यातला संगीतकारही गवसलाय. रसिकांची सेवा करण्यासाठी एका कलाकाराला आणखी काय हवं?
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
दीनानाथांचा गुणर्जन्म!
तेजस्वी, लखलखत्या, पल्लेदार स्वरांचे स्वामी असणाऱ्या मा. दीनानाथ यांना केवळ ४२ वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांची जागा अन्य कोणी घेणं अशक्यच.
First published on: 26-01-2014 at 12:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunarjanma of dinanath