आपल्या अनोख्या अदाकारीने स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण करणारा हिमेश रेशमिया आता नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘सूर रतन धन पायो’ या नॉन स्टॅाप लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून तो गाण्यांची अनोखी मैफिल सजवणार आहे. ‘पीपल्स आर्ट्स सेंटर’च्या सहयोगाने शुक्रवार १९ फेब्रुवारीला सायं ७ वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात ही लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्ट रंगेल.
येत्या १९ फेब्रुवारीला होणारा ‘सूर रतन धन पायो’ हा अनोखा कॉन्सर्ट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे. या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये हिमेश रेशमियाचा दमदार परफॉर्मन्स व स्वरांची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. अनेक गाजलेली गाणी या कॉन्सर्टमध्ये सादर केली जाणार आहेत. या म्युझिक कॉन्सर्टच्या तिकीटांची विक्री षण्मुखानंद सभागृहात सकाळी १० ते सायं ७ वा. पर्यंत सुरु आहे.
गायक, संगीतकार, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या समोर आलेल्या हिमेश रेशमियाने ‘आपका सुरूर’, ‘खिलाड़ी ७८६’ यासारख्या चित्रपटात अभिनय केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
हिमेश रेशमियाचे ‘सूर रतन धन पायो’
‘सूर रतन धन पायो’ या नॉन स्टॅाप लाईव्ह कॉन्सर्ट
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 13-02-2016 at 15:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himesh reshmiyas music concert in mumbai