अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीवर जोरदार टीका होत आहे. या टीकाकारांना फटकारत अभिनेत्री हिना खानने रियाला पाठिंबा दिला होता. रिया सोडून जगात अनेक विषय आहेत त्यांच्यावर देखील व्यक्त व्हा, असा सल्ला तिने टीकाकारांना दिला. यामुळे तिला देखील सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र ट्रोलर्सला हिनाने प्रत्युत्तर दिलं आहे. मी नेहमी मी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी राहते, असं ती म्हणाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

“मी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी राहाते. चाहत्यांना मी विनंती करेन तुम्ही देखील माझ्यासोबत उभे राहा. आपण जर एकमेकांना पाठिंबा दिला तर आपल्याला कुठल्याही मीडिया ट्रायल घाबरण्याची गरज नाही. कोणाचीही भीती न बाळगता मी स्वत:चं मत मांडते. कारण माझी ताकत सत्यामध्ये आहे. जय हिंद.” अशा आशयाचं ट्विट करुन हिना खानने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

एकता कपूरची नागिन ठरली ‘खतरों के खिलाडी’ची विजेता; पटकावली ‘मेड ईन इंडिया’ ट्रॉफी

यापूर्वी काय म्हणाली होती हिना खान?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्री हिना खानला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला. “पुराव्यांअभावी अशी टीका करु नका त्यामुळे तिचं करिअर संपून जाईल”, असं मत हिनाने व्यक्त केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan rhea chakraborty sushant singh rajput death case mppg