हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डीजे स्टीफन बॉस यांनी आत्महत्या केली आहे. १३ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला आहे. स्टीफन बॉस ‘द इलेन डी जोन्स’ आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ सारख्या शोसाठी ओळखले जात होते. याशिवाय ते त्याच्या उत्कृष्ट नृत्यासाठीही प्रसिद्ध होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत पोलिसांना बॉसचा मृतदेह सापडला. दुसरीकडे, स्टीफन बॉसची पत्नी एलिसन हॉकरने या प्रकरणी माहिती दिली. ती म्हणाली की बॉस त्यांची कार न घेता घरातून निघून गेले होते, हे खरं तर खूप विचित्र होतं, कारण बॉस कधीही त्यांच्या कारशिवाय कुठेही जायचे नाहीत.

स्टीफन बॉस यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एलेन हॉकरने एक निवेदन दिलंय. “मला जड अंतःकरणाने सांगावं लागत आहे की माझे पती स्टीफन आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत. ते आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व देत असे. प्रेम त्यांच्यासाठी सर्वस्व होते. ते आमच्या कुटुंबाचा कणा होते. ते एक चांगले पती आणि वडील होते. त्यांच्या चाहत्यांसाठीही ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची पोकळी आयुष्यात नेहमीच जाणवेल.”

स्टीफन बॉस यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तसेच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. स्टीफन बॉस यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याचेही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood actor dj stephen boss committed suicide hrc