बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेता हृतिक रोशनने हृदान आणि हृहान या आपल्या मुलांसोबतचे एक सुंदर छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. सदर छायाचित्रात तिघांनीही जांभळ्या रंगाचा सूट, काळे शर्ट आणि एकसारखेच शूज परिधान केले आहेत. हे तिनही रोशन सूटमध्ये खरचं रुबाबदार आणि देखणे दिसत होते.
हृतिकने हे छायाचित्र ट्विट केले असून त्यावर लिहले की, “माझी मुले माझ्यासाठी प्रेरणा आहेत.”