धूम गर्ल कतरिना तिच्या कामापेक्षाही रणबीरसोबतच्या मैत्रीमुळे जास्तच चर्चेत राहिली आहे. यावर रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेवर बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने मी अद्याप एकटी असून, लग्न करण्याची सध्यातरी माझी इच्छा नाही, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कतरिना आणि रणबीरची स्पेनमधील छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू असल्याचे समजले जात आहे. मात्र, यावर ते आपले खासगी क्षण असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे.
कतरिना म्हणाली की, लग्न होईपर्यंत मी एकटीच आहे. हे माझे वाक्य आहे आणि आता याचा प्रत्येकजण वापर करत आहे. याच्यावर माझे कॉपीराइट असायला हवेत. सध्यातरी लग्न करण्याची माझी इच्छा नाही. कोणी एकटं किंवा विवाहीत असू शकत. पण, माझ्या मागे पळणा-यांची मी परवा करत नाही. सेलिब्रिटींना या गोष्टींची सवय झालेली असते. मात्र, रणबीरसोबत साखरपुडा ठरल्याच्या अफवेबाबत बोलणे कतरिनाने टाळले.
पूर्वाश्रमीचा प्रियकर सलमान खान आणि आताचा प्रियकर रणबीर कपूर या दोघांपैकी कोण जास्त रोमॅण्टिक असल्याचे विचारले असता, मला लांब आणि शांततापूर्ण जीवन जगायचे आहे, असे ती म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am single no plans to get married yet says katrina kaif