बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या फॅशन आणि कलेक्शनबाबत कायमच इंडस्ट्रीमध्ये मोठी चर्चा असते. हे कलेक्शन कधी कपड्यांचे असते, कधी घड्याळांचे तर कधी गाड्यांचे. याशिवायही हे स्टार्स आपल्या आवडीही जपत असतात. विशेष म्हणजे त्या जपताना ते पैशांचाही फारसा विचार करत नाहीत. फॅशनच्या जगतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनुष्काने सुरु केलेला नुष हा ब्रँडही चांगलाच प्रसिद्ध आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार अनुष्का शर्मा नुकतीच विमानतळावर दिसली होती. यावेळी तिच्याबरोबरच तिने घातलेल्या कपड्यांकडे आणि बॅगेकडे उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्काने ग्रे रंगाचा पूर्ण बाह्यांचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातल्याचे दिसत आहे. त्यावर तिने घातलेले पांढऱ्या रंगाचे शूही खुलून दिसत होते. त्यावर तिने Prada या ब्रँडची बॅकपॅक घेतली असून त्यावर एक किचेनही होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हे किचेन सैफियानो लेदरचे असून त्यावर त्रिकोणी आकाराचा मुलामा चढवलेला लोगोही आहे. यामध्ये एक रोबोट असल्याचेही दिसते. या किचेनची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हे किचेन ३०५ डॉलर म्हणजेच २०,८४० रुपयांचे आहे. या किंमतीत तुमची भारत ते श्रीलंका ट्रीप होऊ शकते. १९१३ मध्ये Prada कंपनी मारियो पारडा यांनी स्थापन केली होती. फॅशन क्षेत्रातील ही एक नामवंत कंपनी असून कपड्यांबरोबरच हँडबॅग आणि गॉगल ही कंपनीची खासियत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you know price of anushkas keychain you can do round trip to sri lanka