१५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील ‘हवा हवाई’ या गाण्याने आणि चित्रपटातील अदाकारीने अभिनेत्री श्रीदेवीने प्रेक्षकांना भुरळ घातली. इतक्या वर्षांनंतर आजही हे गाणे तेवढेच लोकप्रिय आहे. चित्रपटातील या गाण्याचेच शब्द घेऊन ‘हवा हवाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तारे जमीं पर’ प्रसिद्ध अमोल गुप्ते याच्या दिग्दर्शकीय स्पर्शाची जादू या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात अमोल गुप्ते याचा मुलगा पार्थो हा मुख्य भूमिकेत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते चित्रपटाची पहिली झलक सादर करण्यात आली. अमोल गुप्ते याचे चित्रपट मला खूप आवडतात. आपल्याच भावभावनांचे प्रतििबब त्या चित्रपटात उमटले आहे, असे प्रेक्षकांना वाटते आणि म्हणून अमोलचे चित्रपट मनाला स्पर्श करून जातात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of hawa hawai movie by sridevi