बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक अभिनेत्री म्हणजे करिना कपूर खान. दीपिका, अनुष्का यांच्या पदार्पणाच्या बऱ्याच वर्षांपूर्वीच करिनाने तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. कपूर कुटुंबातील या आणखी एका सुंदर अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्याच्या घडीलासुद्धा करिना एका मुलाच्या मातृत्वाची जबाबदारी सांभाळत करिअरलाही तितकच प्राधान्य देत आहे. सौंदर्य, चित्रपट, अदाकारी या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या बेबोने तिचे कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत काल ३७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी मुलगा तैमुरसोबत ती पहिल्यांदाच बर्थडे सेलिब्रेशन करत असल्याने तिच्यासाठी हा दिवस आणखीनच खास होता.
वाचा : PHOTOS रणबीर कपूर, माहिरा खान करताहेत एकमेकांना डेट?
आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी करण जोहर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा, कुणाल खेमू आणि सोहा अली खान हे उपस्थित होते. अमृताने या पार्टीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोला तिने ‘हॅप्पी हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग बेबो’, असे कॅप्शन दिलेय.
करणने करिनासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘बर्थडे गर्ल.’ तसेच, ‘की अॅण्ड का… मी या दोघांमधील ‘अॅण्ड’ आहे’, असे कॅप्शन त्याने बेबो आणि अर्जुनसोबतच्या फोटोलो दिलेय.
वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार कारगिलमध्ये शहीद झालेल्या ‘या’ लष्करी अधिकाऱ्याची भूमिका?
लवकरच आई – बाबा होणारे सोहा आणि कुणालही पार्टीला आले होते. फ्लोरल प्रिन्टमधील गाउनमध्ये यावेळी सोहा खूप सुंदर दिसत होती.
करिना कपूर खान सध्या बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. रीया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात ती काम करत असून, वाढदिवसासाठी तिने चित्रीकरणातून दोन दिवसाची सुट्टी घेतली होती. नुकतीच बेबो मुलगा तैमुरसह तिच्या आईच्या म्हणजेच बबिताच्या घरी गेली होती. त्यावेळचे या माय लेकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.