‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रभासने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. प्रभास आणि सैफला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहे. आता या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अभिनेत्री कियारा अडवाणीला विचारले असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्यामुळे प्रभास आणि सैफ सोबत चित्रपटात कियारा मुख्यभूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली होती. या पोस्टरमध्ये श्रीरामाचे धनुष्यबाण दिसत होते. तर दुसरीकडे हनुमान आणि रावण दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारण आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.