“…पण मला त्याच्या सावलीत राहायचे नाही”, सलमान खानच्या कथित प्रेयसीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

पण नुकतंच तिने सलमानसोबत नाव जोडल्याचे विविध फायदे आणि तोटे आहेत, असे विधान केले आहे.

बॉलिवूडमधील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सध्या सलमानचे नाव लूलिया वंतूरसोबत जोडले जात आहे. रोमानियाची लूलिया वंतूर आजकाल सलमानच्या प्रत्येक कार्यक्रमात, त्याच्या कुटुंबासोबत दिसते. त्यामुळे या दोघांमधील नात्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. पण सध्या ती तिच्या ‘मैं चला’ या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी तिने सलमानसाठी ‘सीटी मार’ हे गाणे गायले होते. पण नुकतंच तिने सलमानसोबत नाव जोडल्याचे विविध फायदे आणि तोटे आहेत, असे विधान केले आहे.

‘मैं चला’ या नवीन गाण्यात गुरू रंधावासोबतचा तिचा गोड आवाज पसंत केला जात आहे. त्या गाण्याला चांगले यशही मिळत आहे. हे पाहून लूलिया प्रचंड खूश असल्याचे दिसत आहे. नुकतंच लूलियाने ई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने सलमानबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. “मला सलमानशिवाय स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मला त्याच्या सावलीत राहायचे नाही,” असे तिने यावेळी म्हटले.

“सलमान खान हा एक चांगला व्यक्ती आणि उत्तम अभिनेता आहे. त्याचा या क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असता तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. पण मला आता माझा स्वत:चा विचार करायचा आहे. मला स्वत:च्या ओळखीने काम करायचे आहे. मी यावर काम करत आहे. विशेषत: इथे मला लोक फारसे ओळखत नसल्यामुळे माझ्यासाठी हे करणे अधिक महत्त्वाचे आहे.” असे लूलियाने सांगितले.

Bigg Boss 15 Winner : महाअंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव लीक, टॉप स्पर्धकांची नावेही समोर

या मुलाखतीत तिला सलमानच्या सावलीतून बाहेर पडणे सोपे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, “तुम्हाला यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही नक्कीच आहेत. त्याच्यासोबत राहिल्याने तुम्हाला एक वेगळे जग पाहायला मिळते. तुम्ही ते जग पाहाता आणि त्यामुळे तुम्हाला मदत होते. जसे मी मघाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याचा अनुभव, त्याची नजर या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो. पण शेवटी तुम्हाला मेहनत करावी लागते.”

“तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. लोक तुम्हाला तुमच्या कामाने तुमच्या लूलिया या नावाने ओळखायला हवे. पण तुम्ही एखाद्याशी संलग्न असाल तर लोक तुम्हाला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या कामाचा आदर असणे ही गोष्ट प्रत्येकाला हवी असते,” असेही ती म्हणाली.

वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने केला ‘Kiss My A** गाण्यावर डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

‘मैं चला’ गाण्याचा अनुभव शेअर करताना लूलिया ही भावूक झाली. मी हे गाणे अगदी मनापासून गायले आहे. आम्ही ते खूप प्रेमाने बनवले आहे. त्यामुळे त्याचा अनुभवही खूप चांगला आहे, असेही तिने म्हटले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iulia vantur want to step out of salman khan shadow says want people to know me by my name nrp

Next Story
अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी