scorecardresearch

Bigg Boss 15 Winner : महाअंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव लीक, टॉप स्पर्धकांची नावेही समोर

मात्र बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. अवघ्या दोन दिवसात बिग बॉसच्या १५ पर्वाचा अंतिम सोहळा रंगणार आहे. येत्या २९ आणि ३० जानेवारीला बिग बॉसचा अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे. त्यासोबत या पर्वात रनरअप ठरलेल्या स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत.

यंदा हिंदी बिग बॉसचे १५ पर्व फारसे लोकप्रिय ठरले नाही. यावेळी बिग बॉसला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत बिग बॉस मागे पडल्याचे पाहायला मिळाले. या शो ला रंजक बनवण्यासाठी अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. मात्र तरीही यंदाचा बिग बॉस फारसा लोकप्रिय ठरला नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसमधून राखी सावंत आणि रश्मी देसाई या दोघीही बाहेर पडल्या. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात फक्त टॉप ६ स्पर्धक शिल्लक आहेत.

सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव लीक झाल्याची माहिती दिली आहे. रिअल खबरी यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे.

रिअल खबरी यांनी केलेल्या ट्विटनुसार, तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉसची विजेती होणार आहे. तर प्रतीक सहजपाल हा यंदाच्या बिग बॉसचा उपविजेता ठरणार आहे. तर करण कुंद्रा आणि शमिता शेट्टी हे दोघांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान रिअल खबरी यांनी केलेले हे ट्विट केवळ अंदाज म्हणून करण्यात आले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार हे प्रेक्षकांना रविवारीच समजणार आहे.

‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ चाहत्याच्या प्रश्नावर पत्नी नम्रता म्हणाली…

बिग बॉस १५ च्या महाअंतिम सोहळ्याला आता अवघे २ दिवस बाकी आहेत. त्याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. याबाबत राखी सावंतनं स्वतःच एका व्हिडीओमधून माहिती दिली आहे. यासोबत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत तिचा पती रितेशसोबत डिनर डेटला जाताना दिसली. राखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 15 winner name leaked before grand finale top 3 contestants rankings also revealed nrp

ताज्या बातम्या