गेल्या काही दिवसांपासून ‘कच्चा बदाम’ हे बंगाली गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर प्रत्येकजण रिल व्हिडीओ बनवत आहे. ज्या व्यक्तीने हे गाणं गायलं आहे त्याच नाव भुबन बड्याकर आहे. आधी भुबन रस्त्यावर शेंगदाणे विकताना गाणं गुणगुणायचा आणि आज तो कोलकातामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेजवर गाणं गात पर्फोमन्स करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुबन स्टेजवर येताच लोकांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. टाळ्या वाजवायल्या, त्याचे नाव घेऊन त्याला चीअर करू लागले. या कार्यक्रमादरम्यान तो एका पाहुण्यासोबत हुक स्टेप करतानाही दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर, सोशल मीडिया सेन्सेशन भुबन बड्याकर ब्लिंगी जॅकेट, टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री इस्लामच्या वाटेवर, ग्लॅमर विश्व सोडून हिजाब परिधान करण्याचा घेतला निर्णय

भुबन हा पश्चिम बंगालच्या बीरभूमि या भागात गाणी गाऊन शेंगदाणे विकायचा. यावेळी एका ग्राहकाने त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्याला यूट्युबवर २० मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kacha badam peanut seller bhuban badyakar perfrom in lavish 5 star hotel in kolkata video viral dcp