तामिळ सुपरस्टार कमल हसन यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना पुढील महिन्यात ‘१५व्या मुंबई चित्रपट महोत्सवा’दरम्यान देण्यात येईल.
दिग्दर्शक-अभिनेता कमल हसन यांच्या चित्रपटसृष्टीतील अफाट योगदानाबाबत ‘द मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस (मामी)’ च्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ” चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदान आणि कार्यासाठी यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही कमल हसन आणि फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा गव्रस यांना देणार आहोत,” असे दिग्दर्शक आणि मामीचे अध्यक्ष श्याम बेनेगल म्हणाले. तसेच, १७ ऑक्टोबरपासून सुरु होणा-या या महोत्सवात विविध ६५ देशांतील २०० चित्रपट दाखविण्यात येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan to receive lifetime achievement award at mami