बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचे कौतुक करणे हे त्या कलाकारासाठी प्रशंसनीय गोष्ट आहे. हीच कौतुकाची थाप यावेळी मिळालेली आहे ती बॉलीवूडची राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रणौतला.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित जाहिरातीसाठी अमिताभ आणि कंगना हे एकत्र काम करत आहेत. कंगनाची प्रशंसा करणारे ट्विट करत बीग बींनी म्हटले की, अखेर कंगनासोबत काम केलेच.. ती प्रतिभावान आणि खूपच छान आहे. यासह त्यांनी कंगनासोबतचा फोटोही ट्विट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut is talented and wonderful amitabh bachchan