सध्या बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. अलीकडेच मराठी कलाक्षेत्रातील मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे, मयुरी वाघ, तृप्ती भोईर या अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार शोधला. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रींचे नाव जोडले जाणार आहे. ‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांमधून आपले मनोरंजन करणारी अभिनेत्री मधुरा देशपांडे हिचा नुकताच साखरपुडा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : PHOTOS गोव्यात नागा चैतन्य-समंथाचा विवाह संपन्न

मधुरा आणि आशय गोखले यांनी ५ ऑक्टोबरला साखरपुडा केला. या सोहळ्याला मधुरा आणि आशयचे नातेवाईक आणि मोजकी मित्रमंडळी उपस्थित होती. हे दोघंही फॅमिली फ्रेण्ड्स असल्यामुळे त्यांची ओळख आधीपासूनच असल्याचे मधुराने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले. आशय हा मुळचा पुण्याचा असून तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. तसेच, ‘रिबन्स अॅण्ड बलून्स’मध्येही तो पार्टनर म्हणून कार्यरत आहे.

वाचा : एखाद्या धर्मात अशी प्रथा असू शकते?- सयाजी शिंदे

आपल्या जोडीदाराविषयी मधुरा म्हणाली की, दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात, या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. त्याच्या आणि माझ्या स्वभावात बराच फरक आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्या तो भरून काढेल आणि त्याच्या आयुष्यातील कमतरता मी भरून काढेन. याच गोष्टीवर माझा विश्वास बसल्यामुळे मी लग्नाला होकार दिला. आशय मला नेहमीच पाठिंबा देतो. मी अभिनय क्षेत्रात असल्यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मला सहकार्य मिळते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या मधुरा दोन – तीन प्रोजेक्टवर काम करत आहे. ती लवकरच आपल्याला रंगभूमीवरही दिसण्याची शक्यता असल्याचे तिने सांगितले.

– चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanyadan ithech taka tambu fame actress madhura deshpande got engaged