बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर आणि इतर सेलिब्रिटींचा समावेश आहे. पण करण जोहरला तर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. ट्रोलिंगला कंटाळून करण जोहर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून लांब होता. आता त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करण जोहरने यापूर्वी १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजलीवाहत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर सुशांतच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्याला नपोटिजम प्रमोटर म्हणत सुनावले आहे. त्यानंतर करणने ट्रोलिंगला कंटाळून त्याचा कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद केला होता.

काय होती करण जोहरची यापूर्वीची पोस्ट?

‘दोष माझाच आहे मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात नव्हतो… मला कधीकधी असे वाटायचे की त्याला आयुष्यातील गोष्टी शेअर करण्यासाठी कोणी तरी हवे आहे… परंतु तरीही मी त्या भावनांचा पाठपुरावा कधीच केला नाही. मी अशी चुक पुन्हा करणार नाही’ असे करणने पोस्ट मध्ये म्हटले होते.