दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल रजत राठौड सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील वेड लावले आहे. अलिकडेच अक्षय कुमारने रजत राठौड यांनी गायलेल्या तेरी मिट्टी या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करुन त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता कार्तिक आर्यनने देखील त्यांच्या आवाजाची स्तुती केली आहे.

अवश्य पाहा – “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती

अवश्य पाहा – “माझा बॉयफ्रेंड ३० फेब्रुवारीसारखा”; उर्वशी रौतेलाने दिलं लग्नाच्या ‘त्या’ फोटोवर स्पष्टीकरण

रजत राठौड यांनी यावेळी ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. “रॉकस्टार पोलीस मॅन. तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला चकित करता.” अशा आशयाची पोस्ट लिहून कार्तिकने त्यांचे कौतुक केले आहे. कार्तिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी अक्षय कुमारने देखील रजत राठौड यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी त्यांनी ‘तेरी मिट्टी’ हे गाणं गायलं होतं. त्यांचा जादूई आवाज ऐकून अक्षय कुमार देखील चकित झाला होता. असंच गाणं गात राहा, तुमचं गाणं ऐकून माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. तुमचा आवाज कमाल आहे. असं म्हणत अक्षयने त्यांची स्तुती केली होती.