सध्या बॉलिवूडचे शेहेनशा अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती पर्व ११’ दिवसेंदिवस रंजक होत आहे. शोमधील मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत असणारा शो म्हणून याकडे विशेष पाहिले जाते. मात्र ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये थोडा विचित्र प्रकार घडला आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेशहून आलेल्या शिवानी ढिंगरा अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसून खेळण्याऐवजी पतीसोबत भांडू लागल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी यांनी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पतीबद्दल असलेल्या सर्व तक्रारींची यादी अमिताभ बच्चन यांच्याकडे दिली. पतीच्या तक्रारींची लिहिलेली यादी पाहून अमिताभ बच्चनदेखील चक्रावले आहेत. शिवानी या अजूनही हॉट सीटवर टिकून आहेत.

शिवानी यांनी लिहिलेली यादी अमिताभ यांच्या हातात सोपवताच त्यांना या यादीबद्दल बोलायचे आहे असे त्या म्हणाल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी हॉटसीटवर बसून पतीसोबत भांडायला सुरुवात केली. पण शिवानी यांच्या गोड स्वभावामुळे त्यांचे भांडण खऱ्या भांडणात उतरले नाही. उलड त्यांनी तक्रारही गोड अंदाजात मांडली होती.

शिवानी यांचे पती एका बॅंकेत कर्मचाऱ्याची नोकरी करतात. ते सकाळी लवकर उठून कमाला जातात आणि संध्याकाळी घरी येतात. त्यांना जेव्हा सुट्टी असते ते त्यांचा संपूर्ण वेळ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हाताळण्यात घालवतात. त्यामुळे ते पत्नीला कुठेही फिरायला किंवा कँडल लाईट डिनरला घेऊन जात नाहीत. म्हणून शिवानी यांनी त्यांची तक्रार केली आहे. सध्या शिवानी ८० हजार रुपयांचा पल्ला पार केला आहे. आता शिवानी किती पैसे जिंकणार हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 11 contestant complaint against husband during show and start quarrel avb