बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत. बॉलिवूडची बेबो करिना कपूर, सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. आता या यादीमध्ये कियारा आडवाणीचादेखील समावेश झाला आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या यशानंतर कियारा फार आनंदी असल्याचे दिसत आहे. ती सतत वेगवेगळ्या आऊटफिट आणि लग्जरी बॅग घेऊन फिरताना दिसते. सध्या कियाराचा मुंबई एअरपोर्टवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कियाराने गुलाबी रंगाची ट्राऊजर परिधान केली असून त्यावर मल्टी कलरचे जॅकेट घातले आहे. या लूकवर तिने हातात काळ्या रंगाची बॅग घेतली आहे. कियारा या लूकमध्ये सुंदर दिसत होती. मात्र तिच्या लूकपेक्षा तिने घेतलेल्या बॅगची सध्या जोरदार चर्चा आहे.

या बॅगची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. वॅलेन्टिनोचा वी लोगो असलेली काळ्या रंगाची ही कियाराची बॅग दोन लाख दोन हजार नऊशे पासष्ठ रुपयांची आहे.

याआधी ही कियाराने तिच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर घेतलेल्या छोट्या बॅगची चर्चा होती. ती छोटी बॅग कियाराने लग्जरी ब्रॅन्ड ‘Chanel’ची घेतली होती. तिची किंमत जवळपास ५ हजार डॉलर म्हणजे ३ लाख ५० हजार रुपये होती.