सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ शोचे हे पर्व आता संपण्याच्या मार्गावर येत असतानाही अजूनही ‘शो’ला म्हणावा तसा टीआरपी मिळालेला नाही. आता या पर्वातील एक शेवटचा प्रयत्न म्हणून आंतराष्ट्रीय युथ आयकॉन किम कर्डाशिअन लवकरच बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना भेटण्यास येणार आहे.
आपल्या आगामी भारतभेटीमध्ये किम कर्डाशिअनच्या घरामध्ये पाहुणी म्हणून दाखल होणार असून, यावेळी ती स्पर्धकांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी काही ‘मोलाचे धडे’ देणार आहे. विविध रिअॅलिटी शोजमधून पुढे आलेली किम तिच्या कामापेक्षा स्वत:वर ओढावून घेतलेल्या वादविवादांसाठी जास्त चर्चेमध्ये असते. बिग बॉसच्या सध्याच्या पर्वामध्ये नेमक्या याच गोष्टीची कमतरता आहे. नेहमीप्रमाणे याही पर्वामध्ये भांडणे, प्रेमप्रकरणे, अरेरावी, कुरघोडय़ा होत असल्या, तरी त्यात तोचतोचपणा जाणवू लागला आहे. त्यात शोच्या सुरुवातीला मोठय़ा दिमाखामध्ये आणलेली विमानाची संकल्पना, सिक्रेट सोसायटीही अचानक गायब झाली. शोच्या सुरुवातीपासूनच स्पर्धकांच्या एकमेकांमधील संबंधांपेक्षा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी येणाऱ्या सेलेब्रिटीजवर जास्त भर दिला गेला. या सर्व कारणांमुळे प्रेक्षकांनीही या पर्वाकडे पाठ फिरवली आहे. आता हे पर्व त्याच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचले आहे. अशा वेळी किम कर्डाशिअनच्या प्रवेशाने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा एक प्रयत्न असेल असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात किम तिच्या बोल्ड अवताराने आणि रोखठोक बोलण्याने हे सहज करू शकेल, यात काही शंका नाही. ‘नमस्ते इंडिया..में किम कर्डाशिअन..आ रहीं हुँ इंडिया में..बिग बॉस के घर में..’ असे सांगत, तिने आपल्या भेटीचा बिगूलही वाजवला आहे. पण या प्रवेशासाठी तिने निर्मात्यांकडून ‘८५ लाख’ अशी घसघशीत मानधनाची मागणीही केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किमचा हा प्रवेश बिग बॉससाठी किती लाभदायक ठरतोय हे येणारा काळच सांगेल.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2014 रोजी प्रकाशित
किम कर्डाशिअन ‘बिग बॉस’च्या घरात
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ शोचे हे पर्व आता संपण्याच्या मार्गावर येत असतानाही अजूनही ‘शो’ला म्हणावा तसा टीआरपी मिळालेला नाही. आता या पर्वातील एक शेवटचा प्रयत्न म्हणून आंतराष्ट्रीय युथ आयकॉन किम कर्डाशिअन लवकरच बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना भेटण्यास येणार आहे.
First published on: 19-11-2014 at 04:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim kardashian in bigg boss house