उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

क्षितिज पटवर्धनने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “ह्याहून भारी ट्विस्ट फक्त Shawshank Redemption मध्ये होता,” असे क्षितिज म्हणाला. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : “मी ना शिवसैनिक, ना राजकारणी तरीही…”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

पटकथा लेखक म्हणून क्षितिजने आजवर ‘माऊली’, ‘डबल सीट’, ‘क्लासमेट’, ‘टाइमपास२’, ‘फास्टर फेणे’ सारखे मराठी चित्रपट केले. तसेच ‘खारी बिस्कीट’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट्स’, ‘हाफ तिकिट’, ‘डबल सीट’ सारख्या नावाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी त्याने गीतकार म्हणून काम केलं. हा पुरस्कार म्हणजे गीतकार म्हणून त्याच्या कामाची पोचपावती आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitij patwardhan post after maharashtra political situation eknath shinde devendra fadnavis dcp
First published on: 30-06-2022 at 18:19 IST