‘लय असत्याल मनमौजी पन लाखात एक माझा फौजी’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शिवानीने झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून अनेकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानीचे शितली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. नुकताच शिवानीने लोकसत्ता ऑनलाइनशी दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान तिने तिचा आगामी प्रोजेक्ट तसेच आयुष्यातील काही खास आठवणींना उजाळा दिला. चला पाहूया शितली उर्फ शिवानीसोबत मारलेल्या खास गप्पा…