लॉकडाउनच्या काळातही तुमचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी विविध सेलिब्रिटींच्या दिलखुलास मुलाखती आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. ज्या अभिनेत्याने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी त्यांना रडवलंसुद्धा.. कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत असंख्य व्यक्तिमत्त्वांची त्याने हुबेहूब नक्कल केली.. विनोद हा त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.. असा अभिनेता म्हणजे सागर कारंडे.. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा चेहरा तुमच्याशी गप्पा मारायला येतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्या म्हणजेच ८ मे रोजी दुपारी २ वाजता सागर कारंडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहे. सागरच्या या डिजिटल मुलाखतीत तुम्हीसुद्धा सहभाग घेऊन त्याला प्रश्न विचारू शकता.

सहभागी होण्यासाठी..

झूम अ‍ॅपच्या माध्यमातून वाचकांना या वेबसंवादात सहभागी होता येईल. सागरला प्रश्न विचारण्यासाठी http://tiny.cc/Loksatta-Digital-Adda1 या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हायचे आहे. या लिंकवर नोंदणी केल्यावर तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. या संदेशात देण्यात येणाऱ्या लिंकवर क्लिक करून सहभाग घ्यायचा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta digital adda comedy actor sagar karande video interview ssv