मालिकांऐवजी प्रेक्षक आता रिअलिटी शोला जास्त पसंती देताना दिसत आहेत. कमी कालावधीत स्वतःची वेगळी ओळख देणा-या अशा कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांचे कलागुण प्रेक्षकांसमोर येते. असाच, महाराष्ट्रातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा लक्स झक्कास हिरोईन हा कार्यक्रम ९एक्स झक्कास वाहिनीने आणला आहे. या टॅलेण्ट हण्टला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून मुंबईत पार पडलेल्या ऑडीशन्ससाठी दहा जणी पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आल्या आहेत.
निवडण्यात आलेल्या तरुणींना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला भेटला दिली. यावेळी सोनालीने तरुणींनी विचारलेल्या चित्रपटाविषयीच्या शंकाचे आणि प्रश्नांचे मुद्देसूद निरसण केले. तसेच, ऑडिशनची तयारी ते कास्टिंग काऊच या विषयांवरही त्यांचा संवाद रंगला. ‘लक्स झक्कास हिरोईन’ मधील स्पर्धक तरुणींची धम्माल-मस्ती शनिवारी 12 एप्रिलला रात्री 9 वाजता 9एक्स झक्कास वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ‘मितवा’ या मराठी चित्रपटासाठी हे टॅलेण्ट होत असून ही स्पर्धा जिंकणा-या तरुणीला स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘लक्स झक्कास हिरोईन’ किताबासाठी चुरशीच लढत
मालिकांऐवजी प्रेक्षक आता रिअलिटी शोला जास्त पसंती देताना दिसत आहेत. कमी कालावधीत स्वतःची वेगळी ओळख देणा-या अशा कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांचे कलागुण प्रेक्षकांसमोर येते.
First published on: 09-04-2014 at 12:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lux zakkas heroine talent hunt show