सध्याचे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. ते दोघे सतत एकमेकांसोबत वळे घालवतानाचे फोटो शेअर करताना दिसतात. तर कधीकधी एकमेकांच्या फोटोवर केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतात. नुकताच मलायकाने अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अर्जुनचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहाताना अर्जुनने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओवर मलायकाना कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट पाहाताना दिसत आहे. अर्जुन हा शर्टलेस असून तो जमिनीवर बसून चित्रपट पाहात आहे तर अर्जुनचा श्वान मॅक्स हा पलंगावर बसून चित्रपट पाहात आहे. हा व्हिडीओ शेअर करत अर्जुनने ‘संदीप और पिंकी फरारचे रिव्ह्यू वाचून मॅक्सने देखील चित्रपट पाहण्यास वेळ काढला आहे. तुम्ही पाहिलात का?’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
अर्जुनच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोराने ‘सो क्यूट’ असे म्हटले आहे. तर रिया कपूरने कमेंट करत ‘Awww’ असे म्हटले आहे.