ख्यातनाम गायक मन्ना डे(९४) यांचे प्रदीर्घ आजाराने बेंगळुरू येथील रूग्णालयामध्ये गुरुवारी निधन झाले आणि चित्रपट सृष्टीतील अजरामर गाण्यांचा आवाज हरपला.
संगीत क्षेत्रात सुवर्ण युग उभे करणारे मन्ना डे यांनी तब्बल ३५०० हून अधिक गाणी गायली. परंतु, मन्ना डे यांना आपल्या पत्नीसाठी एक खास रोमॅन्टीक गाणे गायचे होते हीच त्यांची अखेरची इच्छा अपूर्णच राहीली.
अजरामर गाण्यांचा आवाज हरपला
मन्ना डे यांच्या निकटवर्तीय सुपर्णा कांती घोष म्हणाल्या, “त्यांना आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गायचे होते. आपल्या आजारपणावर मात करुन त्यांना लवकरात लवकर पुन्हा गायचे होते आणि त्या दृष्टीने ते आशादायी देखील होते. आपल्या पत्नीसाठी त्यांना गाणे गायचे होते. हीच त्यांची अखेरची इच्छा होती.” असेही त्या म्हणाल्या.
याचवर्षी मन्ना डे यांनी आपल्या पत्नीची आठवण म्हणून रवींद्र संगीताच्या माध्यमातून चार गाणी गाणार होते. परंतु, शरिराने त्यांची साथ दिली नाही आणि प्रदिर्घ आजाराने आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पाहा:’मन्ना डे’ यांची प्रसिद्ध गाणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manna deys last wish was to record song for wife