रक्ताच्या नात्यापलिकडे जर कोणतं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं असेल तर ते म्हणजे मैत्रीचं नातं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक लोक भेटत असतात. मात्र यात फार कमी जण आपल्या आयुष्याचा भाग होतात आणि शेवटपर्यंत साथ देतात. त्यामुळे याच मोजक्या आणि जवळच्या व्यक्तींना आपण मित्र किंवा मैत्रीण असं नाव देतो. खरं तर या मैत्रीची व्याख्या एका शब्दात किंवा वाक्यात व्यक्त करता येणार नाही. परंतु, आज फ्रेंडशीप डे असल्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या परीने आपल्या मित्रांना खास शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे. यात कलाकार मंडळीदेखील मागे नाहीत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक यानेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांना फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


“जगात मित्र शोधणं.. आणि मित्रात जग शोधणं दोन्ही उत्तमच.. हॅप्पी फ्रेंडशीप डे”, अशी पोस्ट प्रसाद ओकने शेअर केली आहे. तसंच कॅप्शनमध्ये मराठीत ‘मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा’, असंही तो म्हणाला आहे.


दरम्यान, प्रसाद ओकप्रमाणेच चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडेनेदेखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे हटके अंदाजात त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.