मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. प्रत्येक विषयावर आपलं मत तो स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता देखील त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत असताना त्याने योगी आदित्यनाथ यांचं कौतुक देखील केलं आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलत आहेत. त्याचबाबत सुमीतने देखील ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमीत राघवनचं ट्विट चर्चेत
“रस्ते, स्पीड ब्रेकर, रोड माफियांबाबत बोलताना एखाद्या राज्याच्या प्रमुखाला मी पहिल्यांदाच पाहतोय किंवा ऐकतोय. त्यांचा हेतू नेमका काय आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यांमधून आणि आवाजामधून स्पष्ट होतं. कोणतीच वायफळ बडबड नाही. शब्दांचा खेळ नाही. योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम.” असं सुमीतने योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे.

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडित-प्राजक्ता माळीलाही ‘रानाबाजार’मधील ‘ती’ अभिनेत्री देते टक्कर, पहिल्यांदाच केलं वेबसीरिजमध्ये काम

योगी आदित्यनाथ यांनी नेमकं काय म्हटलं?
सुमीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, “रस्त्याच्या बाजूला कोणतीच वाहनं उभी करू नयेत. हायवेला तर कित्येक ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात येतात. पण असं का होतं? यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नियमित पेट्रोलिंग करा. अन्यथा गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करा. एखाद्या ढाब्यावर देखील पार्किंगसाठी जागा नसेल तर अशा ढाब्यांवर कारवाई करा.”

आणखी वाचा – Loksatta Exclusive : “कलाकारांपेक्षा घोड्याचा खर्च अधिक कारण…” प्रविण तरडेंनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा

योगी आदित्यनाथ यांनी ट्राफिक, रस्त्यांवर होणारे अपघात आणि त्यावर काय उपाय करता येईल हे सांगताना ते या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सुमीतने ट्विट केलेल्या या व्हिडीओला अनेकांना कमेंट्स केल्या आहेत. महाराष्ट्राला देखील अशा नेतृत्वाची गरज आहे, मुंबईमध्ये असे नियम लागू केले पाहिजेत अशा विविध कमेंट्स करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sumeet raghvan tweet yogi adityanath video and talk about roads speed breakers road mafia kmd
First published on: 23-05-2022 at 19:41 IST