आज समाजात पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कोणतंही क्षेत्र असो महिला त्यामध्ये मोठ्या हिंमतीने आणि जिद्दीने उतरत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एक स्त्री ही देवीचचं रुप आहे असं म्हटलं जातं. सध्या सर्वत्र नवरात्रीचं वातावरण आहे. या काळात देवीची पुजा करण्यासोबतच काही जण आपल्या आयुष्यातील स्त्रीचं स्थान, तिचं कार्य या सगळ्यांना सलाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या पत्नीला दुर्गा म्हटलं असून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“My Wife, My Durga! माझा आरसा! खूप fun, खूप happy, आणि थोडी eccentric. माझे गुणदोष मला तोंडावर सांगते, हातचं न राखता… जी माझा परिवार खंबीरपणे सांभाळते म्हणून कामाचे वाट्टेल तेवढे तास, वेळा, स्ट्रेस याचं काहीच वाटत नाही. जी तिचं घर सोडून माझ्या घरात आली आणि तिचे जन्मदाते नसलेल्या आईवडिलांना भरभरून माया दिली. घरातल्या सगळ्यांची काळजी, विचारपूस आणि प्रेम तर इतकं करते कि थक्क व्हायला होतं. असे प्रसंग कमी येतात की बसून तिला सांगावं, तिचं महत्व… कृतज्ञता व्यक्त करावी..,” अशी पोस्ट स्वप्नीलने त्याच्या बायकोसाठी लिहिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor swapnil joshi share some special post for wife ssj