‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे आदेश बांदेकर. अभिनेते-सूत्रसंचालक म्हणून ते कायमच चर्चेत असतात. आदेश बांदेकर यांची पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटात त्या झळकणार आहेत. नुकतंच सुचित्रा बांदेकर यांनी आदेश बांदेकरांसाठी खास उखाणा घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाईपण भारी देवा या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच एका प्रमोशनला सुचित्रा बांदेकरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी सुचित्रा बांदेकरांना उखाणा घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अरे बापरे असं म्हणत प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : “जेवढा पैसा-प्रसिद्धी जास्त…” शिवाली परबच्या नव्या लूकवर चाहते नाराज, म्हणाले “तू साधीच…”

यावेळी उपस्थित महिलांपैकी एकीने “भावोजी आम्हाला सर्वांना उखाणे घ्यायला लावतात, आज तुम्ही उखाणा घ्या”, असे म्हटले. त्यावर सुचित्रा बांदेकरांनी “अरे बापरे तुमच्या खूपच अपेक्षा आहेत. असं कसं पटकन नाव घेणार”, असे गंमतीत म्हटले.

यानंतर सुचित्रा बांदेकरांनी आदेश बांदेकरांसाठी छान उखाणा घेतला. “दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, बांदेकर उभ्या महाराष्ट्रभर फिरता, कधी-मधी आपल्याही घरी येत चला”, असा उखाणा सुचित्रा बांदेकर यांनी घेतला.

आणखी वाचा : “मी शूटींगला गेल्यावर आदेश…” पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी केला खुलासा

दरम्यान सध्या सुचित्रा बांदेकरांच्या या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुचित्रा बांदेकरांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओही शेअर केला आहे. “बांदेकरांसाठी स्पेशल उखाणा”, असे कॅप्शन सुचित्रा बांदेकरांनी या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओला त्यांचा मुलगा सोहम बांदेकरनेही लाईक केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress suchitra bandekar special ukhana for aadesh bandekar during promotion watch video nrp