मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट २०२२च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहीट ठरला. ‘वेड’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत होते. प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालेला ‘वेड’ काही दिवसांपूर्वीच डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनीही रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनेही नुकतंच हॉटस्टारवर ‘वेड’ चित्रपट पाहिला. ‘वेड’ पाहिल्यानंतर विवेक ओबेरॉयने इन्टा स्टोरी शेअर केली आहे. ‘वेड’ पाहिल्यानंतर विवेक ओबेरॉय भारावून गेला आहे. इन्स्टा स्टोरी शेअर करत त्याने रितेश व जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा>> अमोल कोल्हेंना दुखापत! घोड्याचा पाय दुमडला अन्…; ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं?

“उत्तमरित्या भावनांचं प्रदर्शन घडवणारा वेडसारखा चित्रपट बनवल्याबद्दल रितेश व जिनिलीया तुमचा अभिमान वाटतो. ज्यांनी ‘वेड’ चित्रपट पाहिला नाही त्यांनी हॉटस्टारवर नक्की बघा,” असं विवेक ओबेरॉयने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. विवेक ओबेरॉयची ही स्टोरी शेअर करत रितेशने त्याचे आभार मानले आहेत.

हेही वाचा>> शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, प्रतिक्रिया देत म्हणाले, “अंकुश चौधरी…”

३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलीया देशमुखचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. रितेश-जिनिलीयाच्या या चित्रपटाताली गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor vivek oberoi praises ritesh deshmukh after watching ved marathi movie kak