गश्मीर महाजनीने मराठी चित्रपटांसह हिंदी मालिकेत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशा कलाकारांवर टीका केली आहे जे या वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्याचे नाटक करतात. लोकांच्या नजरेत राहणं हे आव्हान नसून तुम्ही स्वतः तसं आयुष्य निवडताय, असं गश्मीरने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकांच्या नजरेसमोर राहणं आव्हान नाही – गश्मीर

‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “लोकांच्या नजरेसमोर राहणं हे आव्हान नाहीये. जर तुम्हाला कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांना दिसत राहावं लागेल, त्यांच्या नजरेत येत राहावंच लागेल. जर तुम्हाला ते आव्हानात्मक वाटत असेल, तर कलाकार होऊ नका, असं मी म्हणेन. तुम्हाला वाटतं की लोकांनी तुमच्याजवळ यावं आणि सेल्फी काढावेत, पण मग तुम्ही त्याची खिल्ली उडवून ग्लॅमराइज करत ‘अरे, हे खूप आव्हानात्मक, माझे खासगी आयुष्य लोकांसमोर आहे आहे’ असं म्हणाल. मग तुम्ही या क्षेत्रात का आले? कलाकार होण्यापूर्वी तुम्हाला माहित होतं की हे घडणार आहे आणि तुम्हाला तेच हवंय. मी खरंच सांगतोय की प्रत्येक अभिनेत्याला हेच हवं आहे.”

“वयानुसार आनंदी राहण्यासाठी अन्…”; घटस्फोटित सुझान खानच्या अफेअरबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया

कलाकारांना अटेंशन पाहिजे – गश्मीर

गश्मीर पुढे म्हणाला, “प्रत्येक अभिनेत्याला वाटतं की त्याची प्रायव्हसी कॉम्प्रोमाईज व्हावी. होय, कलाकारांना अटेंशन पाहिजे असतं, जे या गोष्टी नाकारतात ते खोटारडे आहेत. आता सोशल मीडियावर लोकांनी आपले खोटे चेहरे दाखवायला सुरुवात केली आहे, प्रत्येकजण खोटं बोलतो. ‘अरे माझे खासगी आयुष्य’ असं ते फक्त बोलतात. पण माझ्यासह प्रत्येक अभिनेत्याला लोकांचं अटेंशन हवं असतं. खरं तर हे सगळं बकवास आहे, कारण ज्या दिवशी लोक तुम्हाला पाहणं बंद करतील, तुमच्याकडे लक्ष देणार नाही त्यादिवशी तुम्ही बरबाद व्हाल, सगळं काही संपेल आणि कोणत्याही अभिनेत्याला हे व्हावं असं वाटत नाही, ज्या दिवशी असे होईल तेव्हा त्यांना असुरक्षित वाटू लागेल.”

‘बेबी बंप खोटा आहे’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिला पुरावा, खरमरीत प्रश्न विचारत म्हणाली…

तुम्ही व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्राम स्टोरीवर…

“ते तुम्हाला म्हणतात, ‘देवा, माझी प्रायव्हेट लाइफ हे माझे खासगी आयुष्य आहे.’ हे सगळं बकवास आहे. कारण तुम्ही तुमचं वैयक्तिक आयु्ष्य व गोष्टी लोकांना कधीच दाखवत नाही आणि कोणीही ते पाहू शकणारही नाही. तुमच्या घरात काय आहे, तुमच्या बेडरूममध्ये काय आहे, हे सगळं खासगी आहे. तुम्ही व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकत नाही तोपर्यंत तोपर्यंत कोणीही ते पाहू शकणार नाही. तुम्ही स्वतःच ते दाखवता आणि मग म्हणता माझं वैयक्तिक आयुष्य खासगी राहू द्या,” अशा शब्दांत गश्मीरने त्या कलाकारांवर टीका केली.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

गश्मीर महाजनी लवकरच ‘खतरों के खिलाडी १४’ मध्ये दिसणार आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांसह ‘इमली’ या हिंदी मालिकेतही काम केलं आहेत. नुकतीच त्याची ‘गुनाह’ वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani slams fake attitude actors says people share personal life videos then talk about privacy hrc