लेकीचा शोध, भीती, काळजी, वेदना अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा (Google Aai Trailer) रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ चित्रपट नेमका कशावर बेतलेला असणार याची चर्चा होती. आता या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका आईच्या विविध भावनिक छटा दाखवणारा ‘गूगल आई’ चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये एक आनंदी कुटुंब दिसत असून अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात ‘गूगल आई’ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडका देखील पाहायला मिळणार आहे.

गूगल आई चित्रपटाची टीम (फोटो – पीआर)

प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

“ती खूप…”, ऐश्वर्या रायबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; दोघांनी २१ वर्षांपूर्वी ‘या’ सिनेमात केले होते रोमँटिक सीन

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले…

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणाले, ”मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मराठीत एखादी तरी कलाकृती करावी, असे मनात होतेच आणि माझी ही इच्छा ‘गूगल आई’च्या निमित्ताने पूर्ण झाली. खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. परंतु या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. यात या चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल. तिनेही यात कमाल अभिनय केला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरणारी आहे. ‘गूगल आई’ला थोडा दाक्षिणात्य टचही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पाहातानाही एक वेगळा अनुभव येईल. तंत्रज्ञानाचा फायदाही आहे, नुकसानही आहे. त्याचा वापर कसा केला जातो, हे महत्वाचे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. थरार, रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie google aai trailer released hrc