प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. नागराज मंजुळे यांनी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली.

या मुलाखतीत नागराज मंजुळेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले. चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. यावेळी नागराज मंजुळेंना त्यांना अण्णा म्हणून आवाज का दिला जातो? त्याबरोबर सर्वात आधी आवाज कोणी दिला होता? याबद्दल त्यांनी खुलासा केला.
आणखी वाचा : पहिला प्रपोज ते सेलिब्रिटी क्रश, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले “आता सांगण्यात…”

“मला माझे धाकटे भाऊ सर्व अण्णा म्हणून आवाज देतात. आम्ही चार भाऊ आहोत, मी सर्वात मोठा असल्याने मला ते सर्वजण अण्णा असं म्हणतात. त्या सर्वांचे मित्र मला अण्णा म्हणायचे. सिनेसृष्टीत आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या आयुष्यात सूरज आला. त्याने मला अण्णा म्हणून हाक मारायला सुरुवात केली.

त्यानंतर मग तो मला सर्वत्र अण्णा नावाचे आवाज द्यायचा. यानंतर मग चित्रपटात आलेली सर्वच मंडळींनी मला अण्णा म्हटलं. मग ते अण्णा अण्णा असं सर्वत्र सेटवर बोलायला लागले, त्यामुळे मग आता तेच नाव पडलं, असे नागराज मंजुळे म्हणाले.

आणखी वाचा : Video : “नागराज मंजुळेंचे आकाशवर जास्त प्रेम”; सल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाले “त्यांनी आम्हाला…”

दरम्यान ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.