‘बायोस्कोप’ चित्रपटातील मित्रा या कथेने सर्वांचीच प्रशंसा मिळवणारी अभिनेत्री वीणा जामकर लवकरचं एक नव्या भूमिकेत सर्वांच्या भेटीला येत आहे. ‘लालबागची राणी’ या चित्रपटातून वीणा एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताचं या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर #LalbaugchiRaniTrailer हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आहे.
मोजक्याच पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारणारी आणि आता ती आपल्यासमोर चक्क ‘लालबागची राणी’ साकारणार आहे. म्हणजे लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे पण मग ही ‘राणी’ कोण असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचे उत्तर तुम्हाला या ट्रेलरमध्ये नक्कीच मिळेल.
‘टपाल’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी लालबागची राणी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर बॉनी कपूर आणि सुनिल मनचंदा यांनी संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie lalbaugchi rani in twitter trend