सलमान खानचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये ३२ वर्षीय प्रियांका जग्गा एक सर्वसामान्य सदस्य म्हणून सहभागी होणार आहे. प्रियांका दिल्लीमध्ये मार्केटिंग रिक्रूटर आहे. ती बोल्ड आणि सुंदर तर आहेच शिवाय ती एका आईही आहे. प्रियांका जग्गा मुइस या नावाने तिला अनेकजण ओळखतात. ३२ वर्षीय प्रियांकाचा जन्म १७ डिसेंबर १९८४ मध्ये झाला. ती इतरांपेक्षा थोडी जास्तच फॅशनेबल आहे. तिच्या या फॅशनमुळेच कदाचित तिच्या सह-स्पर्धकांना तिच्याबद्दल इर्श्या वाटू शकते. सध्या तरी तिला बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या इतर १३ स्पर्धकांशी अटीतटीची टक्कर द्यावी लागेल. प्रियांकाच्या मते, ‘मी एक मॉर्डन आई आहे. मी रुढीवादी नक्कीच नाही, त्यामुळे नियम तोडताना मला काहीच वाचत नाही. अनेकदा लोक मला आणि माझ्या फॅशनकडे सारखे बघत असतात. पण मला काहीच फरक पडत नाही. लोकं माझ्याबाबतीत काय विचार करतात याचा विचार मी अजिबात करत नाही.’ दिल्लीच्या पेज थ्री वर्तुळात सतत दिसणाऱ्या प्रियांकाला नृत्य, बॅ़मिंटन, ट्रेकिंग, आणि आपल्या मित्र परिवारासोबत वेळ घालवणं पसंत आहे. तिच्या फेसबुकवर तर फक्त तिचेच फोटोशूट दिसते.
‘बिग बॉस’ १० मध्ये प्रियांकाने का असावे? प्रियांका फॅशनेबल तर आहेच. शिवाय तिच्यात आत्मविश्वासही भरपूर आहे. बिग बॉसच्या घरी राहण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास असणे फार आवश्यक असते. जो तिच्यात परिपूर्ण आहे. आपल्या सह-स्पर्धकांना आपल्या बाजूने कसे करुन घ्यायचे हे तिला चांगलेच माहित आहे. फेसबुकवर तिचे दोन अकाऊंट आहेत एक अकाऊंट तिचे वैयक्तिक आहे तर दुसरे तिचे अन्य प्रोफाइल आहे.
‘बीग बॉस’चे १० वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. यावर्षीही सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. १६ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. या रिअॅलिटी शोच्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनही दिसणार आहे.