बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आता पॉर्न प्रकरणात मिस इंडिया युनिव्हर्स झालेल्या परी पासवानचं नाव समोर आलं आहे. परीने मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप केले आहेत. तिचा पॉर्न व्हिडीओ शूट केल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, या कंपनीचे नाव परीने सांगितले नाही.

परी एक मॉडेल असून ती काम शोधण्यासाठी मुंबईला गेली होती. ‘मी काम शोधण्यासाठी मुंबईला गेली होती. तिथे माझ्या कोल्ड्रिंगमध्ये नशेचे पदार्थ टाकले आणि माझा पॉर्न व्हिडीओ शूट केला. जेव्हा मला या विषयी कळाले तेव्हा मुंबईत जाऊन मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती,’ असे परी म्हणाली.

आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये असलेल्या धनबादमध्ये परीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात पॉर्न चित्रपटांमध्ये काम केल्याचा आरोप केला आहे. तर हुंडा छळ केल्याचा गुन्हा दाखल केल्यामुळे सासरचे लोक तिला बदनाम करण्यासाठी हा आरोप करत असल्याचे परी म्हणाली आहे.

आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा

झारखंडच्या परिने २०१९ मध्ये मिस इंडिया युनिवर्स हा किताब जिंकला होता. तर कतरासच्या नीरज कुमारशी मे २०२१ मध्ये लग्न केले होते. आता हुंडा मागत असल्याची तक्रार परिने केल्याने तिच्या पतीला अटक केली.