लंडनमध्ये २०१७ ची मिस साऊथ आफ्रिका डेमी लेघ नेल पीटर्स हिच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. उत्तर जोहान्सबर्गमधील हाईड पार्कसारख्या गजबजलेल्या ठिकाणी बुधवारी ही घटना घडली. डेमी आपल्या कारमध्ये असताना तीन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बंदूक रोखून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेमी कशीबशी त्यांच्या तावडीतून निसटली. घाबरलेल्या मनस्थितीत पळत असतानाच काही अंतरावर डेमीला दोन सुरक्षारक्षक दिसले. त्यावेळी डेमीने त्यांच्याकडे मदत मागितली. या सुरक्षारक्षकांनी डेमीला सुरक्षित स्थळी नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘चोरांनी तिच्याकडील मोबाईल, हँडबॅग अशा काही वस्तू चोरल्या आहेत. अपहरकर्त्यांकडून डेमीची कार चोरण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, सुरक्षारक्षक घटनास्थळी वेळीच आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

https://twitter.com/MbalulaFikile/status/872549743540547584

वाचा : पोट भरण्यासाठी नवाजुद्दीन कोथिंबीर विकायचा

मिस साऊथ आफ्रिका सौदर्यं स्पर्धेची विजेती असलेल्या डेमीसोबत घडलेल्या या घटनेचा सोशल मीडियावर अनेकांकडून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे संकटाला तोंड देणाऱ्या डेमीची स्तुतीदेखील काही नेटीझन्सनी केली. दरम्यान तिच्या चोरलेल्या वस्तू परत मिळवण्यात जोहान्सबर्गच्या पोलिसांना यश मिळालंय. या घटनेचा पुढील तपास वेगाने करण्यात येणार असल्याचे आश्वासनदेखील पोलिसांनी दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss south africa demi leigh nel peters 2017 robbed in london