या चित्रपटाचे वैशिष्ट्य इतक्यावरच थांबत नाही. तर याच ‘राघु मैना’ला राज्य शासनाकडून सर्वोत्तम प्रथम क्रमांकाचा चित्रपट (अक्षर फिल्म्स इंटरनॅशनल, अकोला), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजदत्त, कथा व पटकथा वसंत सबनीस, कला दिग्दर्शक किशोर मोरे हे पुरस्कार देखील प्राप्त झाले. एकूण तेवीसपैकी सहा पुरस्कार हे विशेषच.
डॅडी देशमुख निर्मित या चित्रपटात तमासगीरांची कथा-व्यथा होती. चित्रपटाची गीते विठ्ठल वाघ, डॅडी देशमुख व श्रीकृष्ण राऊत यांची होती व संगीत विश्वनाथ मोरे यांचे होते. ‘ऐका आम्ही आज सांगतो…’, ‘तुमचं नाव गाव काय सांगा की…’, ‘नदी काठी मी एकाकी करीत होते आंघोळ…’ इत्यादी गाण्यांचा समावेश होता. चित्रपटात निळू फुले, राघवेन्द्र कडकोळ, अशोक सराफ असे दमदार कलाकार देखील होते. नाना पाटेकरच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. विशेषत: नाना पाटेकरचे ग्रामीण रुप हे या चित्रपटाचे विशेष होय. नानाच्या रुपेरी प्रवासाचे टप्पे विचारात घेताना ‘राघु मैना’ वेगळेपण दर्शवितो.
दिलीप ठाकूर