अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
यंदा प्रथमच सप्टेंबर महिन्यात शिवारफेरीला प्रारंभ केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अवलोकनासाठी कृषी विद्यापीठात २० एकरावर जिवंत पिक प्रात्यक्षिके साकारण्यात येत…
अकोला जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लम्पी’ प्रादुर्भाव वाढत आहे. आता शहरातदेखील ‘लम्पी’बाधित जनावर आढळून आले. शहरातील हिंगणा मार्ग परिसरातील एका नर वासरात…
सणासुदीच्या काळात सुरक्षेसाठी अकोला पोलीस प्रशासन ‘दक्ष’ झाले. प्रत्येक गणेश मंडळासाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी अंमलदार कर्तव्यावर…