छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. कधी शोमध्ये असलेल्या स्पर्धकांमुळे तर कधी परिक्षकांमुळे. यावेळी ‘इंडियन आयडल १२’चे परिक्षक अनु मलिक यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनु मलिक यांना इस्रायलचा जिमनास्ट डोल्गोपयात यांना ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाल्यानंतर ट्रोल करण्यात आले आहे. खरतरं ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या देशाचं राष्ट्रगीत लावले जाते, आणि डोल्गोपयात यांचा जिमनॅस्ट खेळात सुवर्ण पदक मिळाल्यानंतर इस्रायलचे राष्ट्रगीत लावण्यात आले आणि नंतर अनु मलिक ट्रोल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांना ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गाणं आठवल. यामुळे नेटकऱ्यांनी अनु मलिक यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला, ‘इस्रायलचं राष्ट्रगीत आणि ‘दिलजले’ या चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ गाण्यात थोडं साम्य आहे. तर अनु मलिकने या गाण्याला संगीत बद्ध केल्याने, मला आता १०० टक्के खात्री आहे की त्याने हे संगीत कॉपी केलं असणार.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अनु मलिकने इस्रायलचं राष्ट्रगीत कॉपी केलं कोण म्हणालं? मला तर वाटतं की ऑलिम्पिकमध्ये अनु मलिकचे ‘मेरा मुल्क मेरा देश गाणं’ हे अनु मलिकच्या सन्मासाठी लावलं होतं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही इस्रायलचे राष्ट्रगीतही सोडले नाही! हे पण कॉपी केलं का? चोरी करण्याची पण एक मर्यादा असते.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘संगीत चोरण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये कोणता खेळ असता तर अनु मलिकला नक्कीच सुवर्ण पदक मिळालं असतं.’

आणखी वाचा : ‘रितेश ८ वेळा माझ्या पाया पडला होता’; जेनेलियाने सांगितला लग्नातील किस्सा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizenst accuses anu malik of copying isreal national anthem for song mera mulk mera desh dcp