लग्नाआधी आई वडिलांची लाडाची लेक लग्न झाल्यावर सासरची सून होते पण लाडाची लेक राहत नाही असं म्हटलं जातं. माहेरचे दरवाजे आजकाल लग्नानंतरही उघडे असतात पण मुलगी मात्र परक्याचं धन म्हणून संबोधली जाते. बापाची लाडाची लेक आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप लग्नानंतरही सावली सारखा आणि देवासारखा उभा राहिला तर.. अशीच एक गोष्ट झी मराठी वाहिनीवरच्या नव्या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या मालिकेत प्रेक्षकांना कस्तुरीचा प्रेमसंघर्ष अनुभवता येईल. या मालिकेत प्रेमात संघर्ष नाही तर प्रेम आणि संघर्ष दोन्ही आहेत. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप असे तगडे कलाकार असणार आहेत. कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
१४ सप्टेंबर पासून ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.
First published on: 01-09-2020 at 17:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi serial on zee marathi ladachi mi lek ga ssv