हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारण्यासाठी विद्या नावाजली जाते. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘घनचक्कर’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर आता विद्या ‘बॉबी जासूस’मध्ये हेराच्या भूमिकेत दिसणार आहे. हेर म्हटलं की वेगवेगळी रुप धारण करण आलंच. दिया मिर्झाच्या फ्री एन्टरटेन्मेंटअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यांनी ट्विट केलेल्या छायाचित्रात विद्या बालन हैद्राबाद स्थानकाबाहेर असलेल्या भिका-याच्या रुपात दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉबी जासूस’मध्ये विद्या ‘फुकरे ‘चित्रपटाने प्रसिद्धिस आलेल्या अली फझलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. समर शेख दिग्दर्शित हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omg is this vidya balans look in bobby jasoos